सावकी(लो.) ता.देवळा जि.नाशिक
gpsavki@gmail.com
सावकी(लो.) ता.देवळा जि.नाशिक
gpsavki@gmail.com
सुचना :
सावकी (लो) हे गाव गिरणा नदीच्या काठावर असलेले असून देवळा तालुक्यात आहे. पुर्वीच्या काळी हे गाव' लोहणैर परगण्यातील असून येथे जहाँगीर रहात होते. त्यांचा भव्य पडका वाडा आजही साक्ष देत ऊभा आहे. तसेच त्या काळी एक सावकार आपला व्यवसाय करीत असे. सावकारी या शब्दावरून सावकी हे नाव पडले असावे. तसेच लोहणेर परगण्यातील असल्याने कंसात (लो) हा शब्द आहे. या गावी मुख्य धंदा शेतीचा असल्याने पुर्वीच्या उदार सावकाराने गिरणा नदिवर भव्य बंधारा बांधुन शेतासाठी आज बागायत १५० एकर जमिन सिंचनाखाली आहे. ऊसाचे पिक मुबलक असल्याने गुन्हाळ्यातून उत्तम प्रतीचा गुळ तयार करण्यात प्रसिद्ध होते. येथे लघुउद्योग म्हणून बैलगाडी शेतीची अवजारे तयार केली जातात. गावात ग्रामपंचायत, पतसंस्था, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट' ऑफीस, तलाठी कार्यालय तसेच महिला व भजनी मंडळ आहे. शिवाय गावात हनुमान मंदिर, राममंदिर, मशिद, स्वामी समर्थ केंद्र इ. विविध देवालये आहेत. एक गाव एक पाणवठा असल्याने हिन्दु - मुस्लीम भाई-भाई' याप्रमाणे सर्व धर्मातील, जातीतील लॊक बंधुभावाप्रमाणे राहतात, असा हा आमचा गाव आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ (हेक्टर मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
ग्रामदैवताचे मंदिर:- सावकी गावात श्रीराम नवमी च्या दिवशी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने पूजा करतात.
सावकी गावात हनुमानाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. हनुमान मंदिर वस्तीची शोभा वाढवतात.व येथे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
सावकी येथे श्री. राम मंदिर आहे.
सावकी पासूनच जवळच गिरणा नदीचा सुंदर असा काठ आहे.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री.प्रशांत पवार
श्री.सी.एम.थोरात
श्री.देवीप्रसाद मांडवडे
सौ. उषाबाई दगडू सोनवणे
श्री.हेमंत वसंत पवार
श्री वसंत गोविंदा भामरे
सौ. रोहिणी जिभाऊ निकम
सौ. लिलाबाई शिवमण बोरसे
श्री. सुभाष तानाजी पवार
श्री. धनाजी गणाजी गायकवाड
सौ. जिजाबाई नामदेव वाघ
श्री. उमेश कारभारी सोनवणे
सौ. कांचन संदीप गांगुर्डे
श्री.नानाजी विश्राम गायकवाड
सौ.सरला अनिल शिवले